Pakistan : तालिबानविरोधात पाकचे आता ‘ऑपरेशन ऑल आऊट!’ | पुढारी

Pakistan : तालिबानविरोधात पाकचे आता ‘ऑपरेशन ऑल आऊट!’

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : तहरिक-ए-तालिबानसह सरकारविरोधी संघटनांच्या पाकिस्तानातील दहशतवादी कारवायांविरोधात ऑपरेशन ऑल आऊट ही धडक मोहीम सुरू करण्याचा निर्णय 41 व्या राष्ट्रीय सुरक्षा बैठकीत घेण्यात आला. (Pakistan)

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर, जनरल शमशाद मिर्झा, केंद्रीय संरक्षण आणि अर्थमंत्र्यांसह पाकिस्तानातील वरिष्ठ नागरी, लष्करी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. (Pakistan)

पाकिस्तानमधून दहशतवादाचा नायनाट केला जाईल. लष्करी मोहिमांसह राजकीय, आर्थिक आणि सामाजिक अंगानेही प्रयत्न केले जातील, असे या बैठकीत ठरले. जनतेलाही या मोहिमेत सोबत घेतले जाणार आहे, असे शनिवारी सांगण्यात आले. पाकिस्तानातील खैबर-पख्तूनख्वाँमध्ये गेल्या 3 महिन्यांत 127 पोलिसांना वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांतून आपला जीव गमवावा लागला. हे सगळेच हल्ले तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेने केले होते. जानेवारीमध्ये पेशावर पोलिस लाइन्समधील मशिदीत नमाज सुरू असताना झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात 96 पोलिस मरण पावले होते. तत्पूर्वी, 2022 मध्ये अशाच एका हल्ल्यात 120 पोलिसांचा मृत्यू झाला होता. नोव्हेंबरमध्ये पाकिस्तान सरकारसोबत तहरिक-ए-तालिबानशी सुरू असलेली चर्चा अखेर फिसकटली. तहरिक-ए-तालिबानने पाकिस्तानातील हल्ले तीव्र केले.

अधिक वाचा :

Back to top button