काँग्रेस नेते सीआर केसवन यांचा भाजपमध्‍ये प्रवेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणाचे कौतुक | पुढारी

काँग्रेस नेते सीआर केसवन यांचा भाजपमध्‍ये प्रवेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणाचे कौतुक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाचे पहिले गव्हर्नर-जनरल सी. राजगोपालचारी यांचे पणतू आणि काँग्रेसचे माजी नेते सीआर केसवन यांनी आज ( दि. ८)  भाजपमध्ये प्रवेश केला. शुक्रवारीच आंधप्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर दोन दिवसांमध्ये काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांनी भाजप प्रवेश केल्याने पुन्हा पक्षाला घरघर लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकभिमुख धोरण, भ्रष्टाचार मुक्त शासन तसेच सुधारणा आधारित सर्वसमावेश विकास अजेंडामुळे भारत एक नाजुक अर्थव्यवस्थेपासून जगातील सर्वात मोठी ५ व्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहचली आहे,अशी भावना भाजप प्रवेशानंतर केसवन यांनी व्यक्त केली.गेल्या दोन दशकापासून काॅंग्रेस पक्षासाठी काम करीत आहे.पंरतु आता पक्ष कार्यासाठी प्रेरित करणारी मूल्ये कमकुवत झाली आहेत,असे म्हणत केसवन यांनी काॅंग्रेसला रामराम ठोकला होता.

राष्ट्रपती पदासाठी जेव्हा द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती तेव्हा काॅंग्रेस पक्षातील एका जेष्ठ नेत्यांने मुर्मू यांच्याबद्दल चुकीच्या शब्दाचा वापर केला होता, याची आठवण देखील याप्रसंगी केसवन यांनी करून दिली.काँग्रेस अंतर्गत राजकारणामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : 

 

Back to top button