Parineeti Chopra Engagement: राघव-परिणीतीचा १० एप्रिलला साखरपुडा? | पुढारी

Parineeti Chopra Engagement: राघव-परिणीतीचा १० एप्रिलला साखरपुडा?

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा १० एप्रिलला दिल्लीमध्ये साखरपुडा होणार असल्याची चर्चा सुरु आहे. एका नव्या व्हिडिओमध्ये व्हायरल होत असलेल्या वृत्तात परिणीती चोप्रा लंडन रवाना झालीय.

परिणीती मागील काही दिवसांपासून चर्चेत आलीय. लग्नाच्या वृत्तावरून ती अचानक प्रकाशझोतात आली. दरम्यान, परिणीती चोप्रा आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्यासोबत या आठवड्याच्या अखेरीस दिल्लीत साखरपुडा करणार आहे, अशी चर्चा होती. आता असं म्हटलं जात आहे की, दोघे १० एप्रिल रोजी साखरपुडा करतील. या सर्व चर्चांमध्ये परिणीती चोप्राचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती म्हणताना दिसतेय की, ती दिल्ली नाही तर लंडनला जातेय.

मागील आठवड्यात बुधवारी परिणीती मुंबई विमानतळावर दिसली होती. परिणीती लाल रंगाच्या स्वेटरमध्ये दिसली होती आणि ती म्हणताना दिसतेय की, ती लंडन जातेय. परिणीती कूल दिसतेय. तिच्या या लूकवर फॅन्सनी कमेंट केले आहेत. एका युजरने म्हटलंय-मुलगा भेटताच मुलींचे रंगच बदलतात.

साखरपुडा दिल्लीत होईल, असे म्हटले जात होते. या सोहळ्यात राघव-परिणीतीचे कुटुंबीय, जवळचे मित्रमंडळी, सहभागी होणार होते. परिणीतीची चुलत बहिण प्रियांका चोप्रादेखील मुंबईत पोहोचलीय. त्यामुळे चर्चा होती की, प्रियांका, निक जोनस आणि मुलगी मालती हेदेखील सोहळ्यात सहभागी होतील.

 

Back to top button