नगर : पाथर्डी बाजार समितीसाठी 160 अर्ज | पुढारी

नगर : पाथर्डी बाजार समितीसाठी 160 अर्ज

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  पाथर्डी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या संचालक पदाच्या अठरा जागांसाठी एकूण 160 उमेदवारी अर्ज दाखल झाले. सोमवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असल्याने इच्छुकांची सहाय्यक निबंधक कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. सहकारी सेवा संस्था सर्वसाधारण 7 जागांसाठी 68, महिला राखीव 2 जागांसाठी 12, इतर मागास प्रवर्ग 1 जागेसाठी 7, विमुक्त जाती भटक्या जमाती 1 जागेसाठी 12, ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण 2 जागांसाठी 30, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग 1 जागेसाठी 10, आर्थिक दुर्बल प्रवर्ग 1 जागेसाठी 7, व्यापारी आडते मतदारसंघाच्या 2 जागांसाठी 10, तर हमाल मापाडीच्या 1 जागेसाठी 4 असे एकूण 160 अर्ज दाखल झाले आहेत.

विद्यमान अठरापैकी आठ संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. भाजपा प्रणित आजिनाथ शेतकरी मंडळाने 99, तर महाविकास आघाडी प्रणित जगदंबा महाविकास आघाडी शेतकरी विकास मंडळाने 51 अर्ज दाखल केले आहेत. आम आदमी पक्षाकडून काही उमेदवारी अर्ज भरले आहेत. मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.
अजय रक्ताटे, जे. बी. वांढेकर, अंकुश कासोळे, वैभव खलाटे, वसंत आमटे, कडूचंद शेटे, सुनील साखारे, मंगल मस्के, सुनंदा गर्जे, किसन आव्हाड, आदिनाथ बडे, मनीषा कर्डिले, रवींद्र आरोळे, कुंडलिक आव्हाड, प्रशांत मंडलेचा, गोरक्ष ढाकणे, बाबासाहेब केदार, सुभाष कोंगे, नारायण पालवे, विजयकुमार लुणावत, बाळासाहेब घुले, सुभाष बर्डे, मधुकर देशमुख, राजेंद्र खेडकर, संदीप वायकर, कल्पजीत डोईफोडे, भगवान आव्हाड, भगवान दराडे, संतोष शिंदे, प्रदीप पाटील आदींसह 160 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येत्या बुधवारी छाननी होणार असून, 20 एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

Back to top button