Yogi Government : मुघलांच्या इतिहासावरून योगी सरकारचा मोठा निर्णय | पुढारी

Yogi Government : मुघलांच्या इतिहासावरून योगी सरकारचा मोठा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : Yogi Government : उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने यूपी बोर्ड आणि सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत. यापुढे शाळांमध्ये मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नसून शैक्षणिक सत्र 2023-24 मधील इयत्ता 12 वी च्या अभ्यासक्रतील इतिहासाच्या पुस्तकातून मुघल इतिहासासंदर्भातील प्रकरण काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय 11वीच्या पुस्तकातून इस्लामचा उदय, संस्कृतींचा संघर्ष, औद्योगिक क्रांती, काळाची सुरुवात हे धडे काढून टाकण्यात आले आहेत.

2023-24 या शैक्षणिक सत्रात इयत्ता 12 वी मध्ये शिकविल्या जाणाऱ्या इतिहासाच्या पाठ्य पुस्तकातील ‘भारतीय इतिहासाचे काही विषय-II’मधून ‘शासक आणि मुघल दरबार’, नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून ‘अमेरिकन वर्चस्व आणि शीतयुद्ध’, स्वतंत्र भारतातील राजकारण पुस्तकातून जनआंदोलनांचा उदय आणि एका पक्षाच्या वर्चस्वाचा काळ, शिवाय 10वी मधील लोकशाही राजकारण 2 या पुस्तकातून लोकशाही आणि विविधता, जनसंघर्ष आणि चळवळ, लोकशाहीची आव्हाने हे धडे काढण्यात आले आहेत.

Back to top button