तणावात असताना वनस्पतीदेखील रडतात; शास्त्रज्ञांनी रेकॉर्ड केला मानवाने न ऐकलेला आवाज | पुढारी

तणावात असताना वनस्पतीदेखील रडतात; शास्त्रज्ञांनी रेकॉर्ड केला मानवाने न ऐकलेला आवाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : वनस्पतींनाही संवेदना असतात हे एका वैज्ञानिक संशोधनानंतर समोर आले आहे. सामान्यपणे वनस्पतींंना धर्म आणि संस्कृतीशी जोडले जाते. मात्र, तुम्हाला माहिता आहे का? वनस्पती जेव्हा तणावात असतात तेव्हा त्यांनाही अश्रू येतात. त्यांनाही वेदना होतात. वेदना झाल्यानंतर ते ओरडतात देखील. कठीण परिस्थिती ओढावल्यानंतर वनस्पती आवाज काढतात, हे एका वैज्ञानिक संशोधनातून समोर आले आहे.

कसा असतो वनस्पतींचा आवाज

सेल जर्नलने प्रकाशित केलेल्या अभ्यासात इस्राईलच्या ३० संशोधनकर्त्यांनी हे संशोधन केले आहे. वनस्पती तणावात असतात तेव्हा वेगळ्या प्रकारचा आवाज काढतात. मात्र, वनस्पतींचा आवाज मानवाला ऐकू येईल एवढ्या क्षमतेचा नसतो, त्यामुळे तो ऐकू येत नाही. वैज्ञानिकांना हे संशोधन टोमॅटो आणि तंबाखुच्या झांडामध्ये मोठ्या प्रमाणात आढळले आहे.

शांत ठिकाणी मानवाला ऐकू येतो आवाज

वनस्पतींचा ओरडण्याचा आवाज आपल्या श्रवण करण्याच्या क्षमतेपेक्षा कमी असतो. मात्र, शांत ठिकाणी वनस्पतींचा आवाज मानवाला ऐकू येऊ शकतो. अनेक प्राण्यांकडेही वनस्पतींचा आवाज ऐकण्याची क्षमता असते.

हेही वाचंलत का?

Back to top button