Antarctica : वेगाने घटत आहे अंटार्क्टिकामधील बर्फ

Antarctica
Antarctica

वॉशिंग्टन : अंटार्क्टिकामधील (Antarctica) बर्फ वेगाने वितळत चालला आहे. हा बर्फ जगभरातील महासागरांच्या माध्यमातून पाण्याच्या प्रवाहांना धीमा करीत आहे. वैश्विक हवामान, सागरी अन्नसाखळी आणि ग्लेशियर्सची स्थिरता यावर यामुळे विनाशकारी प्रभाव पडू शकतो. एका नव्या संशोधनानुसार अंटार्क्टिकामधून खोल समुद्राच्या पाण्याचा प्रवाह 2050 पर्यंत 40 टक्के कमी होऊ शकतो.

'नेचर' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचे (Antarctica) एक जीवाश्म वैज्ञानिक आणि हवामान बदलाबाबतच्या एका सरकारी पॅनेलचे सदस्य एलन मिक्स यांनी सांगितले की हे सर्व बदल अतिशय वेगाने घडत चालले आहेत. असे वाटते की ते आताच गियर बदलत आहेत आणि हा गंभीर चिंतेचा विषय आहे.

न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातील मॅथ्यू इंग्लंड यांनी सांगितले की हे मॉडेल जर अचूक असेल तर खोल समुद्राची एक धारा एका अशा प्रक्षेपवक्रावर असेल जी कोसळण्याच्या कड्यावर आहे. जसे जसे तापमान वाढते अंटार्क्टिकाच्या (Antarctica) वितळणार्‍या बर्फातून ताजे पाणी समुद्रात प्रवेश करते. त्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याची क्षारता व घनत्व कमी होते. तसेच समुद्राच्या तळात खालील बाजूस प्रवाह कमी होतो.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news