भाजपचा पर्दाफाश करण्यासाठी संकल्प सत्याग्रह: विशाल चांदूरकर | पुढारी

भाजपचा पर्दाफाश करण्यासाठी संकल्प सत्याग्रह: विशाल चांदूरकर

विटा : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यामागे भाजपचे मोठे षड्यंत्र आहे. भाजपच्या या कटकारस्थानाचा पर्दाफाश करण्यासाठी संकल्प सत्याग्रह उपक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे खानापूर तालुका निरीक्षक विशाल चांदूरकर यांनी दिली.

राष्ट्रीय काँग्रेसच्या पक्षीय कार्यक्रमानुसार तालुका, गाव, जिल्हा, प्रभागस्तरावर कोपरा सभा तसेच पत्रकार बैठका आयोजित करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विट्यामधील काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसची व्यापक बैठक झाली. यावेळी पक्षनिरीक्षक विशाल चांदूरकर, आटपाडीचे पक्ष निरीक्षक गजानन सुतार, शहराध्यक्ष सुरेश पाटील, मंगरूळचे उपसरपंच आणि युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

चाकूरकर म्हणाले, शेल कंपन्यांच्या माध्यमातून अदानी यांच्या कंपनीत गुंतवलेले २० हजार कोटी रुपये कोणाचे आहेत, असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. ज्वाईंट पार्लमेंटरी कमिटी (जेपीसी) नेमून चौकशी करावी, अशी मागणी केली होती. ही मागणी भाजप व प्रधानमंत्री यांना गोत्यात आणणारी होती. त्यामुळे जुनी केस उकरून कोर्टात ती अचानक बोर्डावर आणली. राहुल गांधी यांना चार महिने, सहा महिन्यांची शिक्षा देता आली असती, पण दोन वर्षांची शिक्षा देणे, आणि लोकसभा सचिवालयाने तातडीने खासदारकी रद्द करण्याची कार्यवाही करणे यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा 

Back to top button