Dam Water Reservoir : राज्यातील धरणांमध्ये अद्यापही ६५ टक्के पाणीसाठा! पुणे विभागात पाण्याची सर्वाधिक उपलब्धता | पुढारी

Dam Water Reservoir : राज्यातील धरणांमध्ये अद्यापही ६५ टक्के पाणीसाठा! पुणे विभागात पाण्याची सर्वाधिक उपलब्धता

कोल्हापूर; सुनील कदम : राज्यात मोठी, मध्यम आणि लहान आकाराची मिळून एकूण3267 धरणे असून त्यांची एकूण पाणी साठवण क्षमता 1715 टीएमसी आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला तरी आजघडीला या सर्व धरणांमध्ये मिळून 1227 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण साठवण क्षमतेच्या 65 टक्के इतका हा पाणीसाठा आहे. सर्वाधिक पाणीसाठा हा पुणे विभागात असून, सर्वात कमी पाणीसाठी कोकण विभागातील धरणांमध्ये आहे. विभागवार उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता यंदा अमरावती आणि नागपूर विभागाला पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. (Dam Water Reservoir)

अमरावती विभाग : एकूण धरणांची संख्या 446, सध्याचा उपलब्ध पाणीसाठा 3293 दशलक्ष घनमीटर म्हणजे 116 टीएमसी. टक्केवारी 61.47. (Dam Water Reservoir)

औरंगाबाद विभाग : एकूण धरणांची संख्या 964, सध्याचा उपलब्ध पाणीसाठा 7372 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 260 टीएमसी. टक्केवारी 72.39. (Dam Water Reservoir)

कोकण विभाग : एकूण धरणांची संख्या176, सध्याचा उपलब्ध पाणीसाठा 2481 दशलक्ष घनमीटर म्हणजे 87 टीएमसी. टक्केवारी 66.12.

नागपूर विभाग : एकूण धरणांची संख्या 384, सध्याचा उपलब्ध पाणीसाठा 4054 दशलक्ष घनमीटर म्हणजे 143 टीएमसी. टक्केवारी 67.01.

नाशिक विभाग : एकूण धरणांची संख्या 571, सध्याचा उपलब्ध पाणीसाठा 5135 दशलक्ष घनमीटर म्हणजे 181 टीएमसी. टक्केवारी 70.92.

अमरावती विभाग : एकूण धरणांची संख्या 726, सध्याचा उपलब्ध पाणीसाठा 12422 दशलक्ष घनमीटर म्हणजे 439 टीएमसी. टक्केवारी 61.12.

पाण्याचा सर्वाधिक औद्योगिक वापर हा पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागात होतो. या विभागांमध्ये असलेली पाण्याची उपलब्धता, पाण्याचा औद्योगिक वापर आणि शेतीसाठीच्या पाण्याची गरज या बाबी विचारात घेता उन्हाळ्याच्या अंतिम सत्रात या विभागांमध्ये काही प्रमाणात पाणी टंचाईच्या झळा जाणवण्याची शक्यता दिसून येत आहे.

अधिक वाचा :

Back to top button