श्री प्रभू यल्लालिंग महाराज कल्याणपिठाची जमीनचे दस्तऐवज बनावट करून विकले : उच्च न्यायालय | पुढारी

श्री प्रभू यल्लालिंग महाराज कल्याणपिठाची जमीनचे दस्तऐवज बनावट करून विकले : उच्च न्यायालय

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : यल्लालिंग गुरुनाथ व्हनमाने (रा.होटगी मठ, ता:-दक्षिण सोलापूर, जि:-सोलापूर) याने श्री प्रभू यल्लालिंग महाराज कल्याणपिठाची जमीन बनावट दस्त तयार करून विकल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांनी त्याचा अटकपूर्वक जामीन अर्ज फेटाळला.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, यल्लालिंग व्हनमाने हा सन 2004 ते 2018 या कालावधीत कल्याणपिठाचा सदस्य नसताना व सन 2018 ते 2022 या कालावधीत सदस्य असताना सदर संस्थेस बक्षीस दिलेल्या जमिनीचे भाग पाडून वेगवेगळ्या खरेदीदारांना नोटरी करून विकले, तसेच जमिनीतून मिळालेल्या उत्पन्नाची विक्री करून त्या रकमेचा स्वतःसाठी गैरवापर करून अपहार केला, तसेच होटगी गावचे तत्कालीन तलाठी व ग्रामसेवक यांच्याशी संगनमत करून बनावट दस्त तयार करून होटगी ग्रामपंचायतचे अभिलेख दप्तरात नोंद केली, अशी फिर्याद आनंद रेवनसिद्ध जाधव यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिली होती.

त्यावर आपणास अटक होऊ नये म्हणून यल्लालिंग व्हनमाने याने मुंबई उच्च न्यायालय येथे अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस मूळफिर्यादी आनंद जाधव यांच्यातर्फे युक्तिवाद करताना एडवोकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात फिर्यादीने दाखल केलेल्या फिर्यादी मधील बाबी या सक्रदर्शनी आरोपी विरुद्ध असल्याचा मुद्दा मांडला. त्यावरून न्यायाधीशांनी अर्जदार आरोपी यल्लालिंग व्हनमाने याचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

 

Back to top button