पुणे: तळेगाव परिसरात बस प्रवाशांची गैरसोय | पुढारी

पुणे: तळेगाव परिसरात बस प्रवाशांची गैरसोय

तळेगाव दाभाडे (पुणे): शहरात आणि परिसरात अनेक ठिकाणी बस थांब्यांच्या ठिकाणी शेड नाहीत. जे आहेत ते मोडकळीस आलेले आहेत. यामुळे सिटी बस प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांना भर उन्हात ताटकळत उभे रहावे लागते. उन्हापासून वाचण्यासाठी कोठेही आडोसा घेऊन उभे रहावे लागते. यामुळे बस आल्यावर धावाधाव होते. अशा परिस्थितीत अपघात होण्याचीही शक्यता आहे. तसेच शेड आणि गाड्यांचे वेळापत्रकांचे फलकही मारुती मंदीर चौक, तळेगाव स्टेशन, स्टेशन चौक, विद्या विहार कॉलनीसह अनेक थांब्यावर नाहीत. हे फलक लावण्यात यावेत आणि तळेगाव दाभाडे ते मनपा पुणे अशी थेट बस सुरु करण्याबाबत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष रविंद्र माने यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळ व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना स्वारगेट येथील पीएमपीएल कार्यालयात दिले. यावेळी हिम्मतभाई पुरोहित, शिवांकुर खेर,निर्मल ओसवाल,उपेंद्र खोल्लम,अमित भागीवंत उपस्थित होते.

Back to top button