फुल टू हंगामा : मिसेस इंडिया डॉ. रम्यता प्रफुल्लचे रूपेरी पडद्यावर पदार्पण | पुढारी

फुल टू हंगामा : मिसेस इंडिया डॉ. रम्यता प्रफुल्लचे रूपेरी पडद्यावर पदार्पण

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुल टू हंगामा या मराठी चित्रपटाव्दारे सुप्रसिद्ध मॉडेल मिसेस एशिया पॅसिपिक व मिसेस इंडिया विजेती डॉ. रम्यता प्रफुल्ल (जमशेदपूर झारखंड) रूपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. साहित्य क्षेत्रात सर्वांना परिचित असलेले, छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा अत्यंत दुर्मिळ व महत्त्वपूर्ण ग्रंथ मराठी भाषेत काव्य अनुवादित करणारे शरद गोरे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत.

रम्यता या नागपूरच्या कन्या असून त्या मिसेस झारखंड, मिसेस इस्ट इंडिया, मिसेस इंडिया, मिसेस एशिया पॅसिपिक विजेत्या आहेत. त्यांनी नागपूर येथून २०१४ साली MBBS चे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या त्या जमशेदपूर झारखंड येथे वास्तव्यास आहेत.

प्रीतम अडसूळ, सौरव चिरमुला प्रकाश धिंङले, सुनील साबळे, अमोल कुंभार, शुभांगी देवकुळे आदी कलाकार हि या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका करीत आहेत. रवींद्र लोकरे यांचे छायाकंन केले आहे. श्रध्दा बनकर यांनी रंगभूषा तर प्रसाद भिलोरे यांनी कला दिग्दर्शन केले आहे. किशोर दळवी यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. माढा, करमाळा, सोलापूर परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.

Back to top button