पुणे : पाटस टोलनाक्याचा भोंगळ कारभार बेततोय प्रवाशांच्या जीवावर ; पुणे-सोलापूर महामार्ग उकरल्याने रोज अपघाताची मालिका | पुढारी

पुणे : पाटस टोलनाक्याचा भोंगळ कारभार बेततोय प्रवाशांच्या जीवावर ; पुणे-सोलापूर महामार्ग उकरल्याने रोज अपघाताची मालिका

खोर : पुढारी वृत्तसेवा :  दौंड तालुक्यातील पाटस टोल प्लाझाचा भोंगळ कारभार हा प्रवाशी वर्गाचा दिवसेदिवस डोकेदुखीचा विषय ठरला गेला आहे. टोल प्रशासन व संबंधीत ठेकेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रवाशी वर्गाने व नागरिकांनी केली आहे. याबाबत माहिती अशी की, पुणे-सोलापूर महामार्गावर रस्त्याला काही ठिकाणी भेगा पडल्याने पाटस टोल प्लाझाकडून कासुर्डी ते पाटस या ठिकाणी रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली हा मुख्य रस्ता उकरला गेला आहे. मुख्य महामार्गावर १ ते २ इंच उकरलेले गेले असल्याने आज त्याठिकाणी दररोज दुचाकी व तीनचाकी वाहनांना अपघात होत असताना दिसत आहे.

मागील आठवड्यात एका दुचाकी चालकाचा अपघात भांडगाव हद्दीत मोरे पंपाशेजारी झाला होता. त्यावेळी त्याचे दोन्ही पाय निकामी झाले होते. शनिवारी (दि. २५) सकाळी पुन्हा एक तीन चाकी रिक्षा या खड्ड्यात पडून पलटी झाली आहे. आता पाटस टोल प्लाझा प्रशासन एखाद्याचा जीव गेल्यावर हे खड्डे भरून काढणार का असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

टोल प्रशासन विभागचा हलगर्जीपणा आज प्रवाशांच्या जीवावर बेतत असून या कामाचे ठेकेदार रस्ता उकरून एक एक आठवडा ठेवत आहे. त्यांच्या या निष्काळजीपणामुळे आज सर्वसामान्य जनेतला नाहक जीवाला मुकावे लागत आहे. संबंधित ठेकदार व पाटस टोल प्रशासन विभाग यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रवाशी वर्गाने व नागरिकांनी केली आहे.

Back to top button