Job Cuts : ‘ॲक्सेंचर’ करणार मोठी नोकर कपात; 19000 कर्मचा-यांवर टांगती तलवार | पुढारी

Job Cuts : 'ॲक्सेंचर' करणार मोठी नोकर कपात; 19000 कर्मचा-यांवर टांगती तलवार

पुढारी ऑनलाइन डेस्क : Job Cuts : टेक कंपन्यांतील मंदी आणि नोकरकपात सुरूच आहे. गुगल, फेसबुक, ट्विटरनंतर आता टेक क्षेत्रातील मोठी कंपनी अॅक्सेंचर देखील मोठी नोकर कपात करणार आहे. कंपनीने गुरुवारी (दि.23) याविषयी जाहीर केले. कंपनी येत्या 18 महिन्यांत सुमारे 19 हजार नोक-या किंवा 2.5 टक्के कर्मचारी कमी करणार आहे. खर्च कमी करण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे पुढील 18 महिने कर्मचा-यांवर नोकरी गमावण्याची टांगती तलवार असणार आहे.

ज्या नोक-या जाणार (Job Cuts) आहे. त्यापैकी निम्म्या नोक-या प्रशासकीय किंवा सपोर्ट फंक्शन्स विभागातील आहेत. ग्राहकांचे बिलिंग होते त्या विभागातील नोक-या जाणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे.

(Job Cuts) अॅक्सेंचर ही जागतिक पातळीवर सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक आहे. अॅक्सेंचरच्या अलीकडील वार्षिक अहवालात 2022 मध्ये 7 लाख 21 हजार कर्मचारी असल्याचे म्हटले आहे. कंपनीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये संपलेल्या 2022 आर्थिक वर्षात सुमारे एक लाख लोकांना कामावर घेतले होते.

कंपनीच्या मुख्य कार्यकारी ज्युली स्वीट यांनी गुरुवारी सांगितले की, आम्ही चक्रवाढ वेतन महागाईच्या कठीण आव्हानांना सामोरे जात आहोत आणि आम्ही ते किंमतीसह करत आहोत परंतु आम्ही ते खर्च कार्यक्षमता आणि डिजिटायझिंगसह देखील करत आहोत, असे त्यांनी सांगितले.(Job Cuts)

यावेळी कंपनीने म्हटले की, “जगभरातील अनेक बाजारपेठांमध्ये लक्षणीय आर्थिक आणि भू-राजकीय अनिश्चितता आहे. ज्याचा आमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे आणि त्याचा परिणाम होत राहील, विशेषत: विदेशी चलन विनिमय दरांमधील अस्थिरतेच्या संदर्भात परिणाम जाणवत आहे.”

कंपनीने गुरुवारी फेब्रुवारीच्या अखेरीस संपलेल्या दुस-या आर्थिक तिमाहीसाठी अपेक्षेपेक्षा चांगला महसूल आणि निव्वळ उत्पन्न नोंदवला आहे. असे, असले तरी बाजारापेक्षा अधिक सावध अंदाज जारी केला.(Job Cuts)

Accenture plc ही आर्यलँडच्या डब्लिन स्थित असलेली व्यावसायिक सेवा कंपनी आहे. ही कंपनी माहिती तंत्रज्ञान आणि कन्सल्टिंग सेवा देते. (Accenture Plc lay off)

हे ही वाचा :

Google layoffs : सहका-यांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ 250 कर्मचा-यांचे गुगलमधून ‘वॉक आउट’

‘सेल्फी’, सोशल मीडियामुळे होतो नकारात्मक परिणाम

Back to top button