देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्याचा अर्थसंकल्प अडविला; केजरीवाल यांचा आरोप | पुढारी

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्याचा अर्थसंकल्प अडविला; केजरीवाल यांचा आरोप

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्याचा अर्थसंकल्प अडविला गेला आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. ‘कृपा करून दिल्लीचा अर्थसंकल्प मंजूर करा’ अशी विनंतीही केजरीवाल यांनी केली आहे.

नियोजित कार्यक्रमानुसार मंगळवारी (दि.२१) दिल्ली सरकारचा अर्थसंकल्प सादर केला जाणार होता. मात्र, अर्थसंकल्पातील काही तरतुदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्रीय गृह मंत्रालयाने केजरीवाल सरकारकडून उत्तर मागविले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीचा अर्थसंकल्प लांबणीवर पडला आहे. दुसरीकडे गृह मंत्रालयाने मागविलेल्या खुलाशावरून आम आदमी पक्ष संतप्त झाला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात ‘तुम्ही आम्हा दिल्लीकरांवर का नाराज आहात’. कृपा करून दिल्लीचा अर्थसंकल्प अडवू नका. हात जोडून प्रार्थना करतो, कृपया आमचा अर्थसंकल्प मंजूर करा’, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.

हेही वाचा 

Back to top button