CM Kejriwal : केजरीवाल यांनी केली ध्यान-धारणा, म्हणाले… | पुढारी

CM Kejriwal : केजरीवाल यांनी केली ध्यान-धारणा, म्हणाले...

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आप नेते मनिष सिसोदिया तसेच सत्येंद्र जैन यांच्या अटकेचा निषेधार्थ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ( दि. ८) होळीचा सण साजरा केला नाही. दरम्यान, देशाच्या भल्याचे कारण देत केजरीवाल यांनी सलग सात तास ध्यान्धा‍रणाही केली. (CM Kejriwal)
सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत केजरीवाल यांनी ध्यान-धारणा केली. तत्पूर्वी सकाळी राजघाटवर जाऊन त्यांनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. ‘शाळा – रुग्णालये बनविणाऱ्यांना पंतप्रधान तुरुंगात टाकत आहेत. दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्यांची पंतप्रधान गळाभेट घेत आहेत. देशाच्या स्थितीबद्दल आपण चिंतीत असून दिवसभर ध्यान-धारणा करणार आहोत’, असे केजरीवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. (CM Kejriwal)
केजरीवाल यांनी ट्विटरवर यासंबंधी एक पोस्ट देखील केली आहे. यामधून त्यांनी संपूर्ण देशभरातील जनतेला या ध्यान-धारणेविषयी आणि भारतातील राजकारणाविषयी माहिती दिली आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ते म्हणतात की, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचा निर्धार तुरूंग तोडू शकणार नाही. याच्यावर झालेल्‍या कारवाईच्‍या निषेधार्थ होळी साजरी करणार नाही. मी दिवसभर ध्यानधारणा करणार आहे. तुम्हालाही मोदीजी चुकीचे वाटत असतील तर होळी साजरी केल्यावर माझ्याप्रमाणे तुम्हीही देशासाठी ध्यान करावे, देवाची प्रार्थना करावी, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.

हेही वाचा

Back to top button