Stock Market Opening | सेन्सेक्सची सावध सुरुवात, अदानी स्टॉक्समध्ये घसरण | पुढारी

Stock Market Opening | सेन्सेक्सची सावध सुरुवात, अदानी स्टॉक्समध्ये घसरण

Stock Market Opening : शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज मंगळवारी (दि.१४) स्थिर पातळीवर खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५८,२२३ वर तर निफ्टी १७,१२० वर होता. त्यानंतर काही वेळातच सेन्सेक्स २०० अंकांनी वाढून ५८,४०० वर पोहोचला. निफ्टीही तेजीच्या दिशेने जाताना दिसत होता. अदानी स्टॉक्समध्ये ५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.

एलटी, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, इन्फोसिस, नेस्ले इंडिया, एचडीएफसी बँक, रिलायन्स आणि टायटन हे शेअर्स हिरव्या चिन्हात खुले झाले आहेत. तर टीसीएस, सन फार्मा, आयसीआयसीआय, एचसीएल टेक, इंडसइंड बँक, विप्रो, कोटक महिंद्रा, ॲक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह यांची सुरुवात घसरणीसह झाली आहे. दरम्यान, सुरुवातीच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया ४ पैशांनी घसरून ८२.२७ वर होता.

हे ही वाचा :

 

Back to top button