Stock Market Closing Bell - शेअर बाजार गडगडला; बँकाना मोठा फटका; इंडसइंड, बंधन बँकेला मोठी झळ | पुढारी

Stock Market Closing Bell - शेअर बाजार गडगडला; बँकाना मोठा फटका; इंडसइंड, बंधन बँकेला मोठी झळ

Stock Market Closing Bell

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअरबाजारात चांगलीच घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी आज आपटी खाल्ली. बँकाना सोमवारी मोठा फटका बसला. सेन्सेक्स ८९७ अंकानी खाली आला तर निफ्टी १७१५४ अंकावर बंद झाला. सेन्सेक्स ५८२३७.८५ अंकावर बंद झाला.

बँकांना सर्वाधिक फटका

बँक निफ्टी हा निर्देशांक ३ वाजून १८ मिनिटांनी ३९७०० इतका खाली होता. ही घसरण २.२१ टक्के इतकी होती. इंडसइंड बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, पीएनबी, बंधन बँक, फेडरल बँक यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत गेल्यानंतर युएस फेडरल व्याजदर आणखी वाढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे, असे Financial Expressने म्हटले आहे. शिवाय जागतिक आर्थिक मंदीची स्थिती आणि भूसामरिक तणाव यामुळे सोन्याच्या किंमती मात्र वाढतील, असेही Financial Expressने म्हटले आहे.

आज ( दि. १३ ) शेअर बाजाराची सुरुवात सकारात्‍मक झाल्‍याचे दिसले. बाजार सुरु होताच सेन्सेक्स १४३ अकांनी वधारत ५९२७८ वर व्‍यवहार सुरु झाले. तर निप्‍टी निर्देशांन ७० अंकांनी वाढला तो १७४८३ वर व्‍यवहार करत आहे. जागतिक बाजारापेठेतील नकारात्‍मक सूरामुळे शुक्रवारी ( दि. १० मार्च ) गुंतवणूकदारांना २.६७ लाख कोटी रुपयांना फटका बसला होता. १० मार्च रोजी शेअर बाजारातील व्‍यवहार बंद होताना सेन्‍सेक्‍स निर्देशांक ५९,०८७वर आला होता.

संबंधित बातम्या

दुपारनंतर शेअर बाजार कोसळला

शेअर बाजाराची सुरुवात सकारात्‍मक झाली तरी दुपारी दोनच्‍या सुमारास सेक्‍सेस ७२९.७४ अंकांनी कोसळत ५८,४०५ वर व्‍यवहार करताना दिसला. निप्‍टीतही २०० अंकांनी घसरण होत १७,२१२ वर व्‍यवहार करत होता. निफ्टीच्या 50 पैकी 40 समभाग घसरले तर सेन्सेक्समधील 30 पैकी 26 शेअर घसरले. त्याचवेळी निफ्टी बँकेच्या 12 पैकी 11 समभागात घसरण झाली.

अदानी ग्रुप, टेक महिंद्राचे शेअर वधारले

आजच्‍या व्‍यवहारात अदानी ग्रुपचे शेअर वधारले. अदानी ग्रीन, अदानी पॉवर, अदानी टोटल, अदानी ट्रान्समिशनने तेजी अनुभवली. अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटलच्या समभागांवर अतिरिक्त दीर्घकालीन लक्ष ठेवण्यात आले आहे. शेअर बाजाराच्या परिपत्रकानुसार हे पाऊल आजपासून लागू झाले आहे.अदानी एंटरप्रायझेस एक टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले.टेक महिंद्रा कंपनीच्‍या शेअर्सनी तेजी अनुभवली. कंपनीने मोहित जोशी यांची नवीन सीईओ म्‍हणून नियुक्‍तीची घोषणा केली होती. यानंतर आज बाजारातील सुरुवातीच्‍या व्‍यवहारात टेक महिंद्राच्‍या समभागांची जोरदार विक्री झाली.

Ambuja Cements, इंडसइंड बँकेची घसरण

इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, पीएनबी, बंधन बँक यांचे शेअर्स घसरले. तर आज Ambuja Cements  शेअरमध्‍ये १.३६ टक्‍के घसरण झाली. अंबुजा सिमेंट कंपनी खरेदी करण्‍यासाठी अदानी ग्रुपने घेतलेले कर्जाच्‍या रक्‍कमेपैकी ५० कोटी डॉलर (४०९७ कोटी रुपये ) अदा करण्‍यात आली आहे. तरीही आज अंबुजा सिमेंटच्‍या शेअर विक्रीकडे कल राहिल्‍याचे दिसले.

Back to top button