फडणवीसांनी विरोधकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला : मुख्‍यमंत्री शिंदे | पुढारी

फडणवीसांनी विरोधकांचा 'करेक्ट कार्यक्रम' केला : मुख्‍यमंत्री शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्‍य सरकारने आज ( दि. ९ ) अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्‍ये प्रामुख्‍याने शेतकरी, महिला तसेच विविध घटकांवर विशेष तरतुद करण्‍यात आली आहे. अर्थमंत्री फडणवीस यांनी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्‍पावर प्रतिक्रिया देताना सांगितले.

अभ्यासपूर्ण सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प आहे. प्रत्‍येक विभाग सक्षम करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्‍यात आला आहे. आम्ही सर्वच क्षेत्रांच्‍या प्रगती करत आहोत. फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला तेव्हा विरोधकांचे चेहरे बघण्यासारखे होते, असा टोलाही यावेळी शिंदे यांनी लगावला.

अर्थसंकल्पात सर्व घटकांचा समावेश आहे. लेक लाडकी योजना मुलींना फायद्याची आहे. अर्थसंकल्पातून महिलांचा सन्मान केला आहे. अडीच वर्ष जे बंद होते त्या सर्व घटकांना चालना मिळेल, अशी ग्‍वाहीही शिंदे यांनी यावेळी दिली.

हेही वाचा

Back to top button