“हा तर चुनावी जुमला” : अजित पवारांची अर्थसंकल्पानंतर पहिली प्रतिक्रिया | पुढारी

"हा तर चुनावी जुमला" : अजित पवारांची अर्थसंकल्पानंतर पहिली प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचा अर्थसंकल्प चुनावी जुमला असतो तसा होता. दूरदृष्टीचा अभाव आणि वास्तवाच भान नसलेला अर्थसंकल्प आहे. स्वप्नांचे इमले आणि शब्दांचे फुलोरे अन् घोषणांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर केली आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, राज्याच्या परिस्थितीच भान नसलेला अर्थसंकल्प आहे. राज्याच उत्पन्न कीती? खर्च कीती होणार? या वास्तवाचं भान नसलेला अर्थसंकल्प आहे. महापुरूषांच्या नावाने मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पण ठोस तरतूद नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा दिल्या पण पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या स्मारकाला निधी कीती? कधी काम सुरू करणार? याबाबत काहीच सांगितल नाही. बोलणाऱ्यांच्या वाणीला आणि ऐकणाऱ्यांच्या कानाला बर वाटव यासाठी सरकारने आठ महिन्यांत ज्या घोषणा केल्या त्याचीच पुनरावृत्ती केली आहे. विकासाच पंचामृत कुणाला दिसणार नाही. याआधी केलेल्या घोषणांच काय झाल? शेतकऱ्यांच उत्पन्न दुप्पट झाल का? राज्याबाहेर निघालेल्या उद्योग थांबवण्यासाठी कोणत्याही प्रकारची घोषणा नाही. नुसत्या घोषणा करूण जनतेला स्वप्नांच्या दुनियेतून फिरवून आणण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली.

शेतकऱ्यांना ६ हजार रूपयांची तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्याची थट्टा करत आहात का? पाच लोकांच्या कुटुंबाचा विचार केला तर प्रत्येकी ३ रूपये दिवसा मिळतात. ३ रूपयांत चहा तरी मिळतो का? शेतकऱ्यांना तुटपुंजी मदतीची गरज नाही, त्यापेक्षा शेतीमालाला भाव द्या. राज्याची परिस्थीती पाहिल्यानंतर राज्याची कर्जबाजारीकडे वाटचाल सुरू आहे. साडेसहालाख कोटी रूपयांच्या पुढे कर्ज गेलेले आहे. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर सरकार जाण्याच्या भीतीने अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्याची टीका पवार यांनी केली.

Back to top button