Instagram डाउन, जगभरातील हजारो यूजर्संना फटका | पुढारी

Instagram डाउन, जगभरातील हजारो यूजर्संना फटका

पुढारी ऑनलाईन : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम (Instagram) गुरुवारी सकाळी देशभरात डाउन झाले. याचा अनुक्षव भारतासह जगभरातील यूजर्संनी घेतला. आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउन डिटेक्टरवर सुमारे 27,000 हून जगभरातील लोकांनी सकाळपासून इन्स्टाग्राम डाउन असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. सुमारे 50 टक्के लोकांनी सांगितले की, Instagram अॅप आणि वेबसाइट दोन्हीवर प्रवेश करणे कठीण झाले आहे. तर सुमारे 20 टक्के लोकांनी तक्रार केली की त्यांना प्लॅटफॉर्मवर लॉग इन करण्यात अडचणी येत आहेत.

आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट Downdetector.com नुसार, युनायटेड स्टेट्समधील 46,000 हून अधिक इन्स्टाग्राम यूजर्संना फोटो-शेअरिंग प्लॅटफॉर्मवर फोटो शेअर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी जाणवल्याचे म्हटले आहे. या समस्येमुळे UK मधील सुमारे 2,000 यूजर्स तर, भारत आणि ऑस्ट्रेलियातील प्रत्येकी 1,000 पेक्षा जास्त यूजर्संना याचा सामना करावा लागल्याचे या अहवाल म्हटले आहे. ही समस्या कोणत्या तांत्रिक समस्यांशी संबंधित होती की, इतर कारणांमुळे निर्माण झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा:

Back to top button