murder : अंबाजोगाईच्या तरुणाचा पुण्यात खून | पुढारी

murder : अंबाजोगाईच्या तरुणाचा पुण्यात खून

अंबाजोगाई; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मगरवाडी येथील ३८ वर्षीय संतोष विश्वनाथ माने (वय ३८, रा . मगरवाडी, ता . अंबाजोगाई) या तरुणाचा पुण्यात खून झाला आहे. या खून प्रकरणात दोघा संशयितांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.

याप्रकरणी संतोषच्या पत्नीच्या फिर्यादीवरून हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने संतोष माने यांच्या कपाळावर धारदार हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी करत त्यांचा खून केला. ही घटना चुडोबानगर, हुलावळे बेंद्रे वस्ती येथे तुषार साखरे यांच्या चाळीमध्ये भरदिवसा घडली. घ

टनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, हा खून कोणत्या कारणास्तव झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

हे ही वाचलं का?

Back to top button