तू असाच प्रेरणादायी रहा | पुढारी

तू असाच प्रेरणादायी रहा

अभिनेता टायगर श्रॉफने २०१४ मध्ये ‘हिरोपंती’ चित्रपटामधून पदार्पण केले आहे. टायगरने अनेक अॅक्शनपटातून अभिनयाची झलक दाखवली आहे. तसेच अभिनेत्री दिशा पटनीबरोबरच्या नात्यामुळेही तो खूप चर्चेत राहिला. दोघांचं ब्रेकअप झाले असले तरीही दिशाने टायगरला ३३ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिशाने टायगरचा एक फोटो इन्स्टाग्रामच्या स्टोरीला पोस्ट केला आहे. त्यामध्ये टायगरच्या ब्लॅक जॅकेटवर वाघाचे पट्टे आहेत आणि त्यासारखी एक टोपी घातली आहे. दिशाने त्यावर ‘हॅपी बर्थ डे टीग्गी, स्टे ब्युटिफुल अॅण्ड इन्स्पायरिंग’ (सुंदर आणि प्रेरणादायी) असे कॅप्शन दिले आहे. तिने गुलाबी हार्टही पोस्ट केले आहेत. दिशा आणि टायगर काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांनी त्यांच्या नात्यावर उघडपणे बोलणे नेहमीच टाळले होते. पण, बॉलिवूडच्या अनेक पाट्यांमध्ये तसेच कार्यक्रमात दोघेही कायम एकत्र दिसत होते. मात्र, २०२२ मध्ये एके दिवशी त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली.

Back to top button