मुंबई लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून १०० कोटींचा दंड वसूल | पुढारी

मुंबई लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून १०० कोटींचा दंड वसूल

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबई लोकलमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून १००.३१ कोटी रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वेकडून एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत १८.८ लाख फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १००.३१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. आतापर्यंतची सर्वात मोठी ही दंडाची रक्कम आहे. यापूर्वी १९१९-२० या काळात ७६.८२ कोटी रुपये वसूल केले होते. यावर्षीची सर्वात अधिक म्हणजे १००.३१ कोटी दंडातून जमा झालेली मोठी रक्कम आहे.

हेही वाचा 

Back to top button