पुणे : मतदारांना पैसे वाटप प्रकरण ; भाजपचे गणेश बिडकर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : मतदारांना पैसे वाटप प्रकरण ; भाजपचे गणेश बिडकर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाचे माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांनी मतदारांना पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पैसे वाटप केल्याच्या आरोपानंतर भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर उतरले. मात्र आता गणेश बिडकर यांच्या सह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बिडकर, मयूर चव्हाण, नईम शेख, बाला शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी फैयाज कासम शेख यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मालधक्का चौक येथील आयशा कॉम्प्लेक्स येथे काही भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याची माहिती युवक काँग्रेस पुणे कॅन्टॉन्टमेन्ट मतदार संघाचे माजी अध्यक्ष फैयाज शेख यांना मिळाली होती. याची खात्री करण्यासाठी ते घटनास्थळी दखल झाले तर त्यांना माजी नगरसेवक गणेश बिडकर, मयूर चव्हाण, नइम शेख, बाला शेख हे दिसले तसेच त्यांच्या हातात असणाऱ्या पिशवीत मतदान स्लीप आणि पैसे असल्याचे आढळले. त्यांनी याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी शेख आणि त्यांच्या सहकाऱ्याना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून घटनास्थळावरून ते पळून गेले. असे फिर्यादीत म्हंटले आहे. याबाबत एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Back to top button