राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणी मंगळवारपासून | पुढारी

राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणी मंगळवारपासून

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुनावणीला मंगळवारपासून सुरुवात होत असून, त्याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. गेल्या आठवड्यात ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी सलग तीन दिवस युक्तीवाद केला होता. यातील तब्बल अडीच दिवस सिब्बल यांनी  युक्तीवाद केला होता.

ठाकरे गटाला युक्तिवाद मंगळवारी संपणार असून, त्यानंतर शिंदे गटाकडून हरीश साळवे तसेच नीरज कौल हे बाजू मांडणार आहेत. ठाकरे गटाकडून उपसि्थत करण्यात आलेले मुद्दे शिंदे गटाचे वकील कशा प्रकारे खोडून काढतात, हे पाहणे महत्त्‍वाचे ठरणार आहे. शिंदे गटाला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देण्याची राज्यपालांची कृती घटनाबाह्य असल्याचे ठाकरे गटाकडून गत आठवड्यात सांगण्यात आले होते. त्यावर उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आज परिस्थिती वेगळी असती, अशी टिप्पणी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी केली होती.

हेही वाचा :

Back to top button