Earthquake : इंडोनेशियात 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप | पुढारी

Earthquake : इंडोनेशियात 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप

पुढारी ऑनलाइन डेस्क : इंडोनेशियाच्या हलमाहेराच्या उत्तरेस शुक्रवारी 6.2 तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने याविषयी माहिती दिली.

एनएससीच्या माहितीनुसार, 99 किमी खोलीवर भूकंपाचे केंद्रस्थान होते. भारतीय वेळेनुसार हा भूकंप शुक्रवारी पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास झाला.

“तीव्रतेचा भूकंप: 6.2, 24-02-2023 रोजी झाला, 01:32:47 IST, अक्षांश: 3.28 आणि लांब: 128.36, खोली: 99 किमी, स्थान: हलमाहेरा, इंडोनेशियाच्या उत्तरेस,” असे ट्विट NSC ने केले. दरम्यान आतापर्यंत यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

तुर्कस्तान-सीरियात झालेल्या मोठ्या भूकंपानंतर भूकंपांची मालिका सुरूच आहे. तुर्की सिरीयामध्ये 6 फेब्रुवारीला सोमवारी भूकंप झाला होता. या भूकंपाने संपूर्ण तूर्की सीरिया हादरले होते. यामध्ये तब्बल 45 हजारापेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर फेब्रुवारीच्या मध्यावधीत तुर्की सीरियात पुन्हा शक्तीशाली भूकंप झाला. काल तजाकिस्तानात चीन जवळचा भाग भूकंपाने हादरला होता. तर आज पहाटे इंडोनेशियात भूकंपाचे धक्के जाणवले.

हे ही वाचा :

Breaking News : Earthquake : ताजिकिस्तानमध्ये 6.8 तीव्रतेचा भूकंप

India Vs Australia : मॅक्सवेल, मार्शचे पुनरागमन

Turkey earthquake | तुर्की, सीरियातील भूकंपबळी ४५ हजारांवर, ९ लाखांहून अधिक लोक झाले बेघर

Back to top button