India Vs Australia : मॅक्सवेल, मार्शचे पुनरागमन

India Vs Australia : मॅक्सवेल, मार्शचे पुनरागमन
Published on
Updated on

मेलबर्न, वृत्तसंस्था : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) संघात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर खेळली जात आहे. या मालिकेनंतर उभय संघादरम्यान वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला आहे. ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श आणि झाय रिचर्डसन या संघात परतले आहेत. हे खेळाडू एकदिवसीय विश्वचषकापूर्वी दुखापतीतून पुनरागमन करत आहेत.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी तीन सामन्यांच्या मालिकेसाठी 16 खेळाडूंचा संघ जाहीर केला. ही मालिका 17 मार्चपासून सुरू होणार आहे. मॅक्सवेलला पाय आणि मार्शला घोट्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण बिग बॅश लीगला मुकावे लागले होते. तर रिचर्डसनला हॅमस्ट्रिंगच्या ताणामुळे ब्रिस्बेन हीटविरुद्धच्या पर्थ स्कॉचर्सच्या फायनलमधून बाहेर पडावे लागले होते.

विश्वचषकाची तयारी करणारा संघ

निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी एका निवेदनात म्हटले, विश्वचषक स्पर्धेला सात महिने बाकी असताना, भारतातील हे सामने आमच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ग्लेन, मिशेल आणि झाय हे सर्व महत्त्वाचे खेळाडू आहेत. आम्हाला वाटते की हा संघ ऑक्टोबरमध्ये दिसू शकतो. यष्टिरक्षक जोश इंग्लिस आणि वेगवान गोलंदाज शॉन अ‍ॅबॉटसह अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस आणि कॅमेरॉन ग्रीन यांना वनडे संघात स्थान देण्यात आले आहे.

अ‍ॅश्टन अगरचाही समावेश –

कसोटी संघातून वगळल्यानंतरही पश्चिम ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अ‍ॅश्टन अगरचा संघात समावेश करण्यात आला आहे. पुढच्या महिन्यात भारतात परतण्यापूर्वी आगर पश्चिम ऑस्ट्रेलियासाठी काही देशांतर्गत क्रिकेट खेळणार आहे. दुसरीकडे, जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकाचा वनडे गोलंदाज जोश हेझलवूड मर्यादीत षटकांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. तो रिहॅबमध्ये आहे.

भारत दौर्‍यासाठी ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ (India Vs Australia)

पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅश्टन आगर, अ‍ॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news