

पुढारी ऑनलाइन डेस्क : Earthquake : ताजिकिस्तानमध्ये गुरुवारी सकाळी 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. चीनच्या सुदूर पश्चिम शिनजियांग प्रदेशाजवळ गुरुवारी पहाटे ६.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाने ताजिकिस्तानचा काही भाग हादरला. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) ने ट्वीट करून याची माहिती दिली आहे.
ताजिकिस्तानमधील मुरघोबपासून 67 किमी पश्चिमेला गुरुवारी 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. USGS ने ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र 20.5 किमी खोलीवर आहे. तजाकिस्तानच्या पश्चिमेला मुरघोबमध्ये M6.8-67 किमी इतक्या परिसरात हा भूकंप झाला. दरम्यान आतापर्यंत भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.