औरंगाबाद : पेट्रोल पंपाजवळ कापसाने भरलेला ट्रक चोरट्यांनी केला लंपास | पुढारी

औरंगाबाद : पेट्रोल पंपाजवळ कापसाने भरलेला ट्रक चोरट्यांनी केला लंपास

अजिंठा; पुढारी वृत्तसेवा : गोळेगाव (ता. सिल्लाड) येथून कापसाने भरलेला ट्रक अज्ञात चोरट्यांने चोरल्याची घटना रविवारी (दि.१९) उघडकीस आली. याबाबत अजिंठा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

पानवडोड (ता. सिल्लोड ) येथील राजेद्र तुकाराम दौड यांच्या मालकीचे ट्रक (एम.एच. २१ बी.एच. ३०२४ ) मध्ये शनिवारी गोळेगाव येथील शेतकऱ्यांकडून कापूस घेऊन सिल्लोड येथील जिनिंग मध्ये घेऊन जाणार होता. शनिवारी (दि.१८ ) उशीर झाल्याने चालकाने कापसाने भरलेला ट्रक औरंगाबाद – जळगाव महामार्गावरील आदित्य पेट्रोल पंपावर उभा करून ठेवला होता. चालक रविवारी सकाळी ट्रक घेऊन जाण्यासाठी पेट्रोल पंपावर आला असता, त्याने रात्री उभा केलेला ट्रक दिसला नाही.

यानंतर त्याने सगळीकडे पाहणी केली. पण त्याला ट्रक दिसला नाही. रात्री अज्ञात्याने ट्रक तिथून चोरल्याची बाब चालकाच्या लक्षात आली. अज्ञाताने पंपावरून ट्रक पळवून नेल्याचे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात दिसले आहे. ट्रकसह एकूण २२ लाख ६६२०० रुपयाचा मुद्देमाल चोरल्या प्रकरणी अज्ञात चोरट्यान विरुध्द अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे करत आहेत.

हेही वाचा;

Back to top button