पुढारी ऑनलाइन डेस्क : Somvati Amavasya 2023 : हिंदू धर्मात अमावस्येच्या तिथीला खूप महत्व आहे. पंचांगानुसार प्रत्येक अमावस्येचे वेगळे नाव वैशिष्ट्य आणि महत्व आहे. मात्र, सोमवती अमावस्येला विशेष महत्व असते. धार्मिक मान्यतेनुसार पितृदोष दूर करण्यासाठी या दिवशी पितरांना तर्पण केल्यास त्यांचे आशीर्वाद मिळतात. हिंदू पंचांगानुसार, फाल्गून मासाच्या कृष्ण पक्षाच्या या सोमवती अमावस्येचे विशेष लाभ प्राप्त करण्यासाठी या त्रिसूत्रींचा मार्ग शास्त्रांमध्ये सांगितला आहे. जाणून घ्या काय आहे सोमवती अमावस्येची तिथी पूजा मुहूर्त आणि त्रिसूत्री –
रविवारी (दि. 19) सायंकाळी 4 वाजून 18 मिनिट तिथी प्रारंभ
सोमवारी (दि. 20) दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी तिथी समाप्ती
पंचांगानुसार दोन दिवस तिथी आली असेल तर उदय तिथीनुसार अमावस्या ग्राह्य धरली जाते. उदय तिथीनुसार सोमवती अमावस्या 20 फेब्रुवारी 2023 दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी ग्राह्य धरावी आणि सर्व पूजा विधी सोमवारी दुपारपर्यंतच करावे.
सोमवारी सकाळी 6 वाजून 56 मिनिटांपासून सकाळी 8 वाजून 20 मिनिटांपर्यंत अमृत काल असेल. तसेच 9 वाजून 45 मिनिटांपासून ते 11 वाजून 10 मिनिटांपर्यंत दान करण्यासाठी उत्तम मुहूर्त असेल.
सोमवती अमावस्येला स्नान-दान आणि तप केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व पापांमधून मुक्ती मिळून पूण्य संचय होतो. तसेच त्याचे शुभ फल प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे.
सोमवती अमावस्येला पवित्र नदीत शाही स्नान करण्याला खूप महत्व आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने आयुष्यातील सर्व दोष दूर होतात, अशी मान्यता आहे.
सोमवती अमावस्येच्या दिवशी दानाचे मोठे महत्व आहे. नदीतील पवित्र शाही स्नान केल्यानंतर पूजा विधी करावे. त्यानंतर आपल्या शक्तीप्रमाणे गरीब, गरजू लोकांना भोजन घालावे. भूकेल्या माणसांना अन्न दान केल्याने मोठे पूण्य प्राप्त होते. याशिवाय वस्त्र दानाला देखील विशेष महत्व आहे. सोमवती अमावस्येला गरजू लोकांना वस्त्र दान करावे. तसेच या दिवशी प्राणी-पक्षी-माशांना देखील खाऊ घातल्याने आयुष्यातील येणारे अडथळे दूर होतात. अशी मान्यता आहे.
सोमवती अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा करून आराधना करावी. यादिवशी नाम जप आणि तप केल्याने मोक्ष प्राप्ती होते, अशी मान्यता आहे.
Somvati Amavasya 2023 : सोमवती अमावस्येला स्नान-दान-तप या त्रिसुत्रीचा अवलंब केल्याने आयुष्यातील समस्या, पितृदोष इत्यादींतून मुक्ती मिळते. या दिवशी दान केल्याने मोठे पुण्य लाभते आणि तप केल्याने मोक्ष प्राप्ती होते, अशी धार्मिक मान्यता आहे. Somvati Amavasya 2023
(वरील माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिली आहे पुढारी ऑनलाइन त्याची हमी देत नाही पूजा विधीपूर्वी जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा)
हे ही वाचा :