काँग्रेस पक्षातील कलह संपला : अमित देशमुख | पुढारी

काँग्रेस पक्षातील कलह संपला : अमित देशमुख

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस पक्षातील कलह आता संपला असून आम्ही पुन्हा कामाला लागलो आहे. पोटनिवडणुकीतून राज्याच्या पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे. त्यामुळेच जनतेचा कौल काय आहे, याची जाणीव झाल्याने भाजपने ऐनकेन प्रकारे निवडणुक जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे त्यांना आजारी असणाऱ्या नेत्यांनाही प्रचारात आण्याची वेळ आली आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख यांनी येथे आज (दि.१७) केली. इस्लामपूर येथे एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर देशमुख पत्रकारांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, भविष्यात राज्याचे नेतृत्व करण्याची संधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मिळाली. तर, राजकीय व कौटुंबिक मैत्री म्हणून आमची त्यांना नेहमीच सद्भावना राहिल. अशा सदिच्छाही त्यांनी यावेळी दिल्या. शिंदे – फडणवीस सरकारने नवीन असे काहीच केलेले नाही. महाआघाडी सरकारचीच कामे ते पुढे नेत आहेत. त्यामुळे मतदार जेव्हा याचे रिपोर्ट कार्ड लिहितील. तेव्हा ते निश्चितच आमच्या बाजूने लिहितील, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, महाराष्ट्रात यापूर्वी असे राजकारण कधीच घडले नव्हते. सामान्य जनतेलाही ते पटलेले नाही. त्यामुळेच जनतेचा कौल आपल्या विरोधात जाईल, याची जाणीव भाजपला झाली आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button