सांगली: ‘राजारामबापू’ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतीक पाटील बिनविरोध | पुढारी

सांगली: 'राजारामबापू' साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतीक पाटील बिनविरोध

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतीक जयंत पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी विजय पाटील यांची बिनविरोध निवड झाली. कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. ३७ वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर आमदार जयंत पाटील यांनी सहकारातून निवृत्ती घेतली आहे.

बिनविरोध झालेले संचालक खालीलप्रमाणे –

प्रताप शामराव पाटील, शैलेश शामराव पाटील, विजय बळवंत पाटील, विठ्ठल भगवान पाटील , कार्तिक मानसिंगराव पाटील, प्रदीपकुमार विश्वासराव पाटील, रघुनाथ पांडुरंग जाधव, बबन जीनदत्त थोटे, रामराव ज्ञानदेव पाटील, दीपक पांडुरंग पाटील, अमरसिंह शिवाजीराव साळुंखे, प्रतीक जयंतराव पाटील, अतुल सुधाकर पाटील, सतीश उर्फ दादासाहेब यशवंत मोरे, प्रकाश रामचंद्र पवार , देवराज जनार्दन पाटील

अनुसूचित जाती जमाती

राजेंद्रकुमार वसंत कांबळे

महिला राखीव

मेघा मधुकर पाटील
योजना सचिन शिंदे

भटक्या विमुक्त जाती जमाती

आप्पासो विष्णू हाके

इतर मागासवर्गीय

हणमंत शंकर माळी.

यावेळी मावळते अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्याहस्ते नुतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, सहायक निबंधक रंजना बारहत्ते उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button