Rahul Gandhi : पंतप्रधानांचे हात थरथर होते, सत्य नेहमी बाहेर येते : राहुल गांधी | पुढारी

Rahul Gandhi : पंतप्रधानांचे हात थरथर होते, सत्य नेहमी बाहेर येते : राहुल गांधी

तिरुवनंतपुरम; पुढारी ऑनलाईन : काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) अदानी प्रकरणावर लोकसभेतील आपल्या भाषणावर ठाम आहेत. वायनाडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधींनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) सडकून टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी लोकसभेत बोलत असताना व ते पाणी पिताना त्यांचे हात थरथरत होते. मी बोलत असताना माझा चेहरा पहा आणि ते बोलत असताना त्यांचा चेहरा पहा. सत्य नेहमी बाहेर येते.

राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, “संसदेतील माझ्या भाषणातील काही भाग काढून टाकण्यात आला. मी कोणाचा अपमान केला नाही. मी जे बोललो त्याबाबत मला पुरावे दाखवण्यास सांगण्यात आले आणि मी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिले, ज्यात मी पुराव्यासह प्रत्येक मुद्दा स्पष्ट केला आहे.” लोकसभा अध्यक्ष मला म्हणाले, “तुमचे शब्द रेकॉर्डवर घेतले जातील अशी मला अपेक्षा नाही’. राहुल गांधी पुढे म्हणाले, ‘पंतप्रधान पंतप्रधान थेट माझा अपमान करतात, पण त्यांचे शब्द काढले जात नाहीत. ते म्हणतात, तुमचे नाव गांधी का? नेहरू का नाही?’

पंतप्रधान मोदींचे हात थरथरत होते

राहुल गांधी पुढे म्हणाले, “सत्य नेहमीच बाहेर येते. तुम्हाला फक्त एवढच करायचं आहे की, मी बोलताना माझा व पंतप्रधान बोलताना त्यांचा चेहरा पहा. लोकसभेत बोलताना ते किती वेळा पाणी प्यायले आणि पाणी पिताना त्यांचे हात कसे थरथर कापत होते.


अधिक वाचा :

Back to top button