Inflation - महागाईचा पुन्हा भडका : खाद्यान्नांच्या किंमतींमुळे महागाईच्या आगीत तेल! | पुढारी

Inflation - महागाईचा पुन्हा भडका : खाद्यान्नांच्या किंमतींमुळे महागाईच्या आगीत तेल!

पुढारी ऑनलाईन : जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाल्याचे सरकारी आकड्यांवरून दिसून येते. जानेवारीत किरकोळ महागाईचा दर ६.५२ टक्के इतका जास्त राहिला आहे. गेली काही महिने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सातत्याने व्याजदर वाढवत आहे, पण महागाई अजूनही नियंत्रणात येत नसल्याचे चिन्ह आहे.

केंद्र सरकारने सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली.

डिसेंबर महिन्यात महागाईचा दर ५.७२ इतका कमी आला होता. त्यामुळे महागाई नियंत्रणात येईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती, पण जानेवारीतील महागाई वाढल्याने चिंतेचा सूर व्यक्त होत आहे.

जानेवारी महिन्यात खाद्यान्नांशी संबंधित घटकांच्या दरात वाढ झाली आहे, असे मनिकंट्रोलने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. अंडी, मसाले, अन्नधान्य यांच्या दरांच्या निर्देशांकात वाढ झालेली आहे. तर खाद्यतेल, साखर यांच्या दरात किरकोळ घट झालेली आहे. जानेवारी खाद्याशी संबंधित घटकांचा महागाईचा दर ५.९४ टक्के इतका राहिला आहे. हा दर डिसेंबर महिन्यात ४.१९ टक्के इतका खाली आला होता.

हेही वाचा

Back to top button