पुणे : शिक्रापूर-पाबळ रस्त्यावर गतिरोधक | पुढारी

पुणे : शिक्रापूर-पाबळ रस्त्यावर गतिरोधक

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : धामारी येथील अपघातानंतर बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर यांनी बेल्हा-जेजुरी रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक करण्याची मागणी केली होती. आंदोलनाचा इशाराही दिला होता. याची दखल घेत माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या. त्यानुसार प्रकल्प संचालक बारभाई, महामार्ग अभियंता पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोन महिन्यांपूर्वी सर्वेक्षण केले.

त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बसविण्यास सुरुवात केली आहे. सध्या हे काम बेल्हा ते शिक्रापूरपर्यंत करण्याचे ठरले आहे.  मंगरुळ, पारगाव मार्गे जांबूत (पंचतळे) पुढे खडकवाडीपर्यंत गतिरोधक तयार करण्याचे काम झाले आहे. रबलिंग, थर्मोप्लास्टिक, दिशादर्शक, सूचनाफलक, डांबरी मोठे गतिरोधक टाकले जात आहेत. हे काम पाच दिवसांत पाबळ, धामारी, मुखई, जातेगाव परिसरात सुरू होईल, असे जांभळकर यांनी सांगितले.

Back to top button