पुणे : …म्हणूनच ताठ मानेने जगतो : किरीट सोमय्या | पुढारी

पुणे : ...म्हणूनच ताठ मानेने जगतो : किरीट सोमय्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘त्या माफिया व नीच सरकारमुळे माझ्या जवळच्यांना त्रास झाला. मात्र, मी आयुष्यात कधी एक दमडीचाही भ्रष्टाचार केलेला नाही. त्यामुळे मी ताठ मानेने जगतो,’ असे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले. या वेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे नाव न घेता बोचरी टीका केली. रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट अँड यांच्या वतीने शनिवारी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात किरीट सोमय्या यांच्या मुलाखतीचे आयोजित केले होते. मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी सोमय्या यांच्या कौटुंबिक आयुष्यापासून सुरू केलेली ही मुलाखत थेट मोदींच्या भेटीपर्यंत नेली.

इतर पक्षांतील नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणारे सोमय्या भाजपमधील कोणी भ्रष्टाचार केला तर काय करतात, असे छेडले असता सोमय्या यांनी, आता नाशिकमध्ये भाजपची कार्यकारिणी बैठक चालू आहे, तुम्हाला मला कायमचे घरी पाठवायचे आहे का, असे म्हणत थेट उत्तर देणे टाळले. मी पक्षातील कोणाचे भ्रष्टाचाराचे प्रकरण असेल, तर पक्षातील व्यवस्थेप्रमाणे वर पाठवितो व दिल्लीतून संबंधितावर पुढील कारवाई होते, असेही सांगितले. भ्रष्टाचार कोणाचाही असो तो नरेंद्र मोदींना मान्य नाही. मोदींनी मला माझे चालू असलेले काम थांबवू नको, अशी सूचना केल्याचेही ते म्हणाले. अदानी प्रकरणाबाबत म्हणाले, आज जगातील पहिल्या चार आर्थिक

महासत्ता असलेल्या देशांमध्ये भारत आहे. त्यामुळे भारतातील कॅपिटल मार्केट तोडण्यासाठी आंतरराष्ट्रीय षड्यंत्र सुरू आहे.
पोलिसांच्या मदतीने माझ्या मुलाच्या खिशात ड्रग्जच्या पुड्या ठेवून त्याला अटक करण्याचे षड्यंत्र महाविकास आघाडी सरकारने आखले होते, असेही ते म्हणाले.

Back to top button