भविष्यात ChatGPT ठरणार ‘डॉक्टरांचा सहाय्यक’! | पुढारी

भविष्यात ChatGPT ठरणार 'डॉक्टरांचा सहाय्यक'!

पुढारी ऑनलाइन डेस्क : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबत दिवसेंदिवस नवनवीन क्रांती होत आहे. ChatGPT हे कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत सर्वात पुढे आहे. सध्या याचीच अनेक ठिकाणी चर्चा आहे. आता नव्याने केलेल्या एका अभ्यासानुसार ChatGPT हे भविष्यात डॉक्टरांना मोठा सहाय्यक ठरू शकते, असे समोर आले आहे. चॅटजीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटिलिजन्स AI) असलेले सर्वात लोकप्रिय सॉफ्टवेअर अमेरिकेतील वैद्यकीय परवाना परीक्षा उत्तीर्ण करू शकते, असे अॅन्सिबल हेल्थच्या अभ्यासातून समोर आले आहे.

टिफनी कुंग, व्हिक्टर त्सेंग आणि अॅन्सिबल हेल्थमधील सहका-यांनी केलेला अभ्यास 9 फेब्रुवारीला PLOS या डिजिटल हेल्थ या ओपन-एक्सेस जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या अहवाच्या हवाल्याने फायनान्शिअल एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

FE ने दिलेल्या माहितीनुसार, कुंग आणि सहकाऱ्यांनी USMLE वर ChatGPT च्या कामगिरीची चाचणी केली. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेत वैद्यकीय परवान्यासाठी तीन परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षांची मालिका अत्यंत नियमन केलेली  आणि कठीण असते. ही परीक्षा बायोकेमिस्ट्री, डायग्नोस्टिक रिझनिंग, बायोएथिक्सपर्यंतच्या बहुतांश वैद्यकीय विषयांच्या ज्ञानाचे मूल्यांकन करते.

प्रतिमा-आधारित प्रश्न काढून टाकण्यासाठी स्क्रीनिंग केल्यानंतर, लेखकांनी जून 2022 च्या USMLE प्रकाशनातून उपलब्ध असलेल्या 376 सार्वजनिक प्रश्नांपैकी 350 वर सॉफ्टवेअरची चाचणी केली. ChatGPT ने तीन USMLE परीक्षांमध्ये 52.4% आणि 75.0% दरम्यान गुण मिळवले. प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अंदाजे 60% आहे, असे अभ्यासात म्हटले आहे.

शिवाय, ChatGPT ने त्याच्या सर्व प्रतिसादांमध्ये 94.6% अचूक आहेत. विशेष म्हणजे, ChatGPT ने PubMedGPT, (बायोमेडिकल डोमेन साहित्यावर विशेष प्रशिक्षित केलेले प्रतिरूप मॉडेल), ज्याने USMLE-शैलीतील प्रश्नांच्या जुन्या डेटासेटवर 50.8% गुण मिळवले.

भविष्यात ChatGPT ठरू शकतो ‘डॉक्टरांचा सहाय्यक’

संशोनात स्पष्ट झाले आहे की, त्यांचे निष्कर्ष वैद्यकीय शिक्षण आणि शेवटी, क्लिनिकल सराव वाढविण्यासाठी ते सहाय्यक ठरत आहेत. याचे उदाहरण देताना ते म्हणाले की, Ansible Health मधील चिकित्सक रुग्णांच्या सहज आकलनासाठी चॅटजीपीटीचा वापर करतात. हे तंत्रज्ञान वैज्ञाकीय क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

हे ही वाचा :

ChatGPTला टक्कर देण्यासाठी गुगल सज्ज; केली ‘ही’ मोठी घोषणा | Google Bard

Gold Silver Rate : सोने-चांदी दरात घट; जाणून घ्या काय आहे आजचा दर 

 

Back to top button