ChatGPTला टक्कर देण्यासाठी गुगल सज्ज; केली ‘ही’ मोठी घोषणा | Google Bard | पुढारी

ChatGPTला टक्कर देण्यासाठी गुगल सज्ज; केली 'ही' मोठी घोषणा | Google Bard

लवकरच येत आहे गुगलचे Bard

पुढारी ऑनलाईन : गेली काही महिने तंत्रज्ञान क्षेत्रात Chat GPTचीच चर्चा आहे. Chat GPT येत्या काही वर्षांत गुगलची जागा घेईल, अशी शंकाही व्यक्त केली जात असतानाच, गुगलने Bardची घोषणा केली आहे. Bard हे थेट Chat GPTशी स्पर्धा करणार आहे.

ChatGPTची निर्मिती Open AIने केलेली आहे. Chat GPTवर २०२१पर्यंतचा डेटा उपलब्ध असून Chat GPTला विचारलेल्या किती तरी प्रश्नांची उत्तर अत्यंत अचूकरीत्या मिळतात. ChatGPTला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेते, यात थेट Microsoft ने गुंतवणूक केली.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मंगळवारी एक ब्लॉग लिहिला आहे, यात Bardची घोषणा त्यांनी केली. ChatGPT सारखेच Bard हे देखील Conversational AIचा प्रकार असणार आहे. गुगलच्या Language Model For Dialogue Applications या तंत्रज्ञानावर Bard आधारित असेल. Bard थेट वेबसाईटवरून डेटा घेऊ शकणार आहे, त्यामुळे Bard हे जास्त वेगवान आणि रिअल टाईम असणार आहे.

पिचाई म्हणाले, “Bardची निर्मिती ही उच्च दर्जाचा प्रतिसाद देण्यासाठी बनवली आहे. त्यासाठी Bard वेबसाईटवरून डेटा घेईल. अगदी ९ वर्षांच्या लहान मुलाला किचकट विषय सोपे पद्धतीने सांगण्याचे काम Bard करेल.”

सुरुवातीला गुगलच्या काही Testerसाठी हे फिचर मिळेल, त्यानंतर ते लोकांना उपलब्ध होईल. मायक्रोसॉफ्टच्या बिंग या सर्च इंजिनमध्येच ChatGPT मिळणार आहे, त्यामुळे Bingची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. हे लक्षात घेत Googleने तातडीने Bardची घोषणा केली आहे.

हेही वाचा

Back to top button