पाटस : जेष्ठ नागरिकाचा धारधार शस्त्राने वार करून खून | पुढारी

पाटस : जेष्ठ नागरिकाचा धारधार शस्त्राने वार करून खून

पाटस(ता. दौंड); पुढारी वृतसेवा : वरवंड येथील वरसगाव पुनर्वसन रहिवाशी असलेल्या जेष्ठ नागरिकाचा पहाटेच्या सुमारास राहत्या घरी डोक्यात वार करून खून करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास हुसेन अलीसो तांबोळी (वय ६०) हे घराबाहेर आले असताना त्यांच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच यवतचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. यासोबतच दौंडचे पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांनी भेट दिली आहे

Back to top button