Tran’S Man Mother :ट्रान्स सर्जरीने महिला बनली पुरुष; आता ‘तो’ होणार ‘आई’… | पुढारी

Tran'S Man Mother :ट्रान्स सर्जरीने महिला बनली पुरुष; आता 'तो' होणार 'आई'...

 पुढारी ऑनलाईन डेस्क : दाम्पत्याने गुड न्यूज दिली!!!! आता तुम्ही म्हणालं यात काय आश्चर्य. पण यात एक आश्चर्य आहे ते म्हणजे हे दाम्पत्य ट्रान्सजेंडर आहे त्याचबरोबर या दाम्पत्यातील ट्रान्समॅन हा आई होणार आहे. आणि ‘ट्रान्समॅन आई’ होणं ही घटना भारतातील पहिली घटना असल्याचा दावा केला जात आहे. हे दाम्पत्य केरळ राज्यातील आहे. या दाम्पत्यातील ‘जिया’ (Ziya) हा जन्मत: पुरुष होता त्यानंतर त्याने स्वत:ला स्त्रीमध्ये रुपांतरीत केले. तर जहाद (Zahad) हा जन्मत: स्त्री होता पण त्याने स्वत:ला पुरुषात रुपांतर केले. नंतर दोघांनी लग्न केले. मात्र, विचित्र गोष्ट अशी ट्रान्सजेंडर करून जो पुरुष स्त्री झाला ती आई होणार नाहीए. तर जी स्त्री ट्रान्स सर्जरीने पुरुष बनली तो पुरुष झाल्यानंतर आता आई होणार आहे. वाचा सविस्तर बातमी. (Tran’S Man Mother)

     

माहितीनुसार, केरळमधील कोझीकोडे स्थित असलेल्या जिया आणि जहाद या ट्रान्सजेंडर दाम्पत्याने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित आपण आई बाबा होणार असल्याचे सांगितले आहे.  यासंबंधी त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बुधवारी (दि.१) फोटो शेअर करत माहिती दिली आहे. येत्या मार्च महिन्यामध्ये ते त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांसोबत एकत्र राहत आहेत. या दाम्पत्यातील एक विषेश बाब म्हणजे, यातील ट्रान्समॅन हा आई होणार आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलं होताना दिसत आहेत. त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Tran’S Man Mother : मला आई व्हावेसे वाटतं होते…

जियाने म्हटले, मी जन्माने आणि शरीराने स्त्री नव्हते. पण माझ्या मनात कुठेतरी स्त्रीत्वाची बीजे होते, मला आई व्हावेसे वाटतं होते. मला कोणीतरी “आई” म्हणावं असं वाटतं होत.  मी अणि जहाद गेले तीन वर्ष एकत्र राहत आहोत. मला आई व्हायचं होतं तर जहादला वडील व्हायचं होतं आणि आता आमच्या दोघांचं हे स्वप्न पूर्ण होतं आहे. आठ महिन्यांचं एक आयुष्य जहादच्या पोटात आहे आणि येत्या काहीच महिन्यात आम्ही एका बाळाला वैद्यकीय सल्ल्यानुसार जन्माला घालत आहोत. असं जियाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. पुढे असेही म्हंटल आहे की, “काळाने आम्हाला एकत्र आणले. तीन वर्षे झाली. माझ्या ‘आई’ व्हायच्या स्वप्नाप्रमाणे, जहादच्या ‘वडील’ होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. आज 8 महिन्यांचे जीवन पूर्ण संमतीने पोटात वाढत आहे.

अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव

जिया आणि जहादने ही गुडन्यूज दिल्यापासून इंस्टाग्राम पोस्टवर हजारो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. नेटकऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केले आहे. तर पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणत आहे की, “अभिनंदन! आज आम्ही इंस्टाग्रामवर पाहिलेली ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. शुद्ध प्रेमाला सीमा नसते. एकाने म्हंटलं आहे की, “खूप आनंद वाटतोय. देव तुम्हाला सदैव आशीर्वाद देवो,” तर एकाने म्हंटल आहे,”तो आत्मा आहे, आश्चर्यकारक!”

कोझीकोडमधील वैद्यकीय कॉलेजमधील डॉक्टरांच्या म्हणण्यानूसार, जिया आणि जिहादने लिंग परिवर्तन केलं आहे. जहाद वैद्यकीय मदतीने स्त्रीचा पुरुष झाला तेव्हा तिचे स्तन काढून टाकण्यात आले होते. पण तिच्या शरीरातील गर्भपिशवी तशीच ठेवण्यात आली होती. आणि लिंग परिवर्तन करण्यापूर्वी जहादने गर्भधारणा केली केली होती त्यामुळे हे शक्य झालं आहे. यामुळे जहाद हा भारतातील पहिला ट्रान्सवूमन ठरु शकतो. जो आई होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ziya Paval (@paval19)

Tran'S Man Mother
Tran’S Man Mother

 

हेही वाचा

Back to top button