Chile wildfires | चिलीमध्ये १५० ठिकाणी जंगलाला आग, १३ ठार, बचावकार्य करणारे हेलिकॉप्टरही कोसळले

Chile wildfires | चिलीमध्ये १५० ठिकाणी जंगलाला आग, १३ ठार, बचावकार्य करणारे हेलिकॉप्टरही कोसळले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण अमेरिकन देश असलेल्या चिलीमध्ये (Chile wildfires) १५० हून अधिक ठिकाणी जंगलाला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे हजारो एकर जंगल नष्ट झाले असून अनेक घरे आगीत भस्मसात झाली आहे. यामुळे आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. चिलीमध्ये सध्या तीव्र उष्णतेची लाट पसरली आहे. यातच आगीच्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान, आग विझवण्यासाठी मदत करणारे हेलिकॉप्टर अरौकानिया प्रदेशात कोसळले. त्यात पायलट, एक बोलिव्हियन नागरिक आणि चिलीच्या एका मेकॅनिकचा मृत्यू झाला आहे. तर आग विझवताना एका फायर फायटरचा मृत्यू झाला आहे.

संपूर्ण चिलीमध्ये १५१ ठिकाणी जंगलाला वणवा लागला आहे. यातील ६५ ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे चिली सरकारकडून सांगण्यात आले आहे. १४ हजार हेक्टर (34,595 एकर) हून अधिक परिसरात आग लागली आहे. चिलीतील बियोबियो प्रदेशात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले क्षेत्र अधिक आहे. येथे सरकारने आपत्ती घोषित केली आहे. चिलीत तीव्र उष्णतेची लाट पसरली असून तापमानाचा पारा उच्चांकावर गेला आहे. दरम्यान, जोरदार वाऱ्यांमुळे जंगलातील वणवा वेगाने पसरत असून ही आग विझवणे आपत्कालीन यंत्रणांना आव्हानात्मक बनले आहे.

आग विझवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा तैनात केली जात असून आग नियंत्रणात आणली जात असल्याचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी म्हटले आहे. दरम्यान, चिलीची राजधानी सँटियागोच्या दक्षिणेस सुमारे ५६० किलोमीटर (३४८ मैल) अंतरावर असलेल्या बियोबियो प्रदेशात दोन वेगवेगळ्या वाहनांच्या अपघातात चार जण ठार झाले आहेत. (Chile wildfires)

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news