नगर : गंज बाजारातील सराफी दुकान फोडले | पुढारी

नगर : गंज बाजारातील सराफी दुकान फोडले

नगर; पुढारी वृत्तसेवा : गंज बाजारातील सराफा दुकानात गुरुवारी (दि.2) चोरी झाली. दुकानाचे कुलूप तोडून बेन्टेक्स आणि चांदीचे दागिने असा चार लाख 27 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, चोरट्यांचा शोध कोतवाली पोलिस घेत आहेत. विनोद युवराज रावल (रा.विनायक कॉलनी) या सराफा दुकानदाराने फिर्याद दिली आहे. रावल यांचे सराफा बाजारपेठेत नवदुर्गा ज्वेलर्स अ‍ॅण्ड आर्ट हे दुकान आहे.

बुधवारी रात्री उशिरा तीन चोरट्यांनी दुकानाचे दोन कुलूप तोडून आत प्रवेश करत ऐवजावर हात साफ केला. तीन चोरट्यांनी मिळून ही चोरी केली असून, त्यातील एकाने दुकानाबाहेबर बसून पाळत ठेवली तर दोघांनी दुकानातील दागिन्यांची चोरी केली. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच श्वान पथक व फिंगरप्रींट पथकाला पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.

Back to top button