Bihar Student Faints : परीक्षा हॉलमध्ये ५०० मुलीत एकटाच विद्यार्थी; घाबरुन पडला बेशुद्ध | पुढारी

Bihar Student Faints : परीक्षा हॉलमध्ये ५०० मुलीत एकटाच विद्यार्थी; घाबरुन पडला बेशुद्ध

पाटना; पुढारी ऑनलाईन : बिहार मधील नांलदा जिल्ह्यात ५०० विद्यार्थिनींमध्ये इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्याने परीक्षा हॉलमध्ये स्वत:ला एकटे पाहताच बेशुद्ध होऊन पडला. बेशुद्ध होऊन पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव मनीष शंकर प्रसाद असे आहे. हा विद्यार्थी ब्रिलियंट कॉन्व्हेंट स्कूल सुंदरगढ येथे गणिताची परीक्षा देण्यासाठी गेला होता. परीक्षा केंद्रावर मनीष शंकर प्रसाद हा एकमेव पुरुष विद्यार्थी असल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला. मोठ्या संख्येने विद्यार्थिनींना पाहून तो घाबरला आणि जमिनीवर कोसळला. (Bihar Student Faints)

विद्यार्थ्याचे वडील सच्चिदानंद प्रसाद यांनी सांगितले की, शाळा प्रशासनाने त्याला मदत केली आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. काही तासांनी त्याला शुद्ध आली. विद्यार्थ्याच्या मावशीने सांगितले की, परीक्षा केंद्रावर पाचशेहून अधिक विद्यार्थिनी उपस्थित होत्या. शाळेच्या प्रशासनाने माझ्या पुतण्याला मोठ्या संख्येने मुलींनी वेढलेल्या शाळेच्या मुख्य हॉलमध्ये जागा दिली. मुलींची मोठी संख्या पाहून मनीष मनावर दडपण आले. तो अस्वस्थ झाला व प्रचंड घाबरला होता. परिस्थितीच्या तनावामुळे तो बेशुद्ध पडला. (Bihar Student Faints)

बिहारमध्ये बुधवारपासून इंटरमिजिएट परीक्षा सुरू झाली असून नालंदा, शेजारील नवादा, मुंगेर, बांका, दरभंगा, समस्तीपूर, अररियासह अनेक जिल्ह्यांमध्ये कॉपीच्या घटना घडल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यासंदर्भात अनेक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आहे.

 


अधिक वाचा :

Back to top button