पार्सलसाठी दोन रूपये चार्ज पे करायला सांगत लिंक पाठवली, नंतर 38 हजार ऑनलाईन काढून घेतले | पुढारी

पार्सलसाठी दोन रूपये चार्ज पे करायला सांगत लिंक पाठवली, नंतर 38 हजार ऑनलाईन काढून घेतले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: क्रेडीट कार्ड डिलीव्हरीसाठी गुगलवर ब्ल्युडार्ट कस्टमर केअर नंबर शोधुन फोन केला असता पार्सल मिळण्यासाठी दोन रूपये चार्ज पे करण्यास सांगून लिंक पाठवत 38 हजार ऑनलाईन काढून घेणार्‍या अज्ञातावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय गणेशराव बारोळे (35, रा. मांजरी) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्या फिर्याद दिली आहे. हा प्रकार 4 आणि 5 जानेवारी रोजी घडला.

Back to top button