टाकवे बुद्रुक येथे धावले 467 बैलगाडे | पुढारी

टाकवे बुद्रुक येथे धावले 467 बैलगाडे

टाकवे बुद्रुक : श्री विठ्ठल रुक्मिणीच्या उत्सवानिमित्त आयोजित बैलगाड्या शर्यतीत 467 गाडे धावले. या बैलगाडा घाटाचे पूजन टाकवे बैलगाडा संघटनेच्या वतीने करण्यात आले. पहिल्या दिवसाचे फायनल सम्राट सदाशिव महिपती लांडगे (भोसरी ता. हवेली ) 11.82 सेकंद मिली पॉईंट, साईनाथ नदकुमार कुटे (पिंपळे सौदागर) 11.85 सेकंद मिली पॉईंट, विलास बबनराव काळोखे (तळेगाव दाभाडे) 11.91 सेंकड मिली पॉईंट मानकरी ठरले.

तर, दुसर्‍या दिवसाचे बबन मारुती पवार (मगरूळ) 11.99 सेकंद मिली पॉईंट, लहू शांताराम बधाले (बधालवाडी) 12.04 सेकंद मिली पॉईंट, सुरेश हाकूजी गायकवाड व जालिंदर विठोबा बराटे जुगलबंदी 12.18 सेकंड मिली पॉईंट हे फायनल सम्राटचे मानकरी ठरले. या वेळी बैलगाडा शर्यतीत विजेत्यांना टाकवे बैलगाडा संघटनेने दोन लाख पन्नास हजार रुपयांचे रोख बक्षीसे विभागून दिली. शर्यत यशस्वी पार पडण्यासाठी ग्रामस्थांनी विशेष नियोजन केले.

Back to top button