आजचे राशिभविष्य (३१ जानेवारी २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (३१ जानेवारी २०२३)

राशिभविष्य

मेष : प्रेमजीवनात काहीतरी खास मिळणार आहे. एखादा मित्र किंवा जुजबी व्यक्तीच्या स्वार्थी वागणुकीमुळे मनःशांती गमावून बसाल.

वृषभ

वृषभ : आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित अशांततेचा सामना करावा लागेल. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल.

राशिभविष्य

मिथुन : आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे! पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते.

राशिभविष्य

कर्क : सामाजिक अडथळे ओलांडणे शक्य होणार नाही. तुम्हाला आजूबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल. प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्या.

सिंह

सिंह : दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता. आर्थिक प्रश्नांमुळे विचार करण्याची ताकद नष्ट होईल.

राशिभविष्य

कन्या : बौद्धिक क्षमता दुबळेपणाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. सकारात्मक विचारसरणीमुळे या समस्येशी दोन हात करू शकाल.

तुळ

तूळ : सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. नातेवाईकांकडे जाणे अडचणीचे ठरेल. गोपनीय माहिती उघड करू नका.

राशिभविष्य

वृश्चिक : निराशावादी दृष्टिकोनामुळे प्रगती करू शकणार नाही. चिंता करण्याच्या प्रवृत्तीमुळे विचारशक्ती मंदावली आहे, हे ओळखण्याची वेळ आहे.

राशिभविष्य

धनु : नशिबावर हवाला ठेवून न राहता आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. हातची गेलेली संधी परत कधीच मिळत नाही हे विसरू नका.

मकर : प्रिय आवडत्या व्यक्तीशी शालीनतेने वागा. सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करू शकतात.

राशिभविष्य

कुंभ : लाभांश किंवा मानधनद्वारे फायदे मिळतील. कुटुंबात शांततेचे दूत म्हणून वागाल. प्रत्येकाच्या प्रश्नांकडे नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणा.

मीन

मीन : तुमच्या वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल.

                                                                                                                            – ज्यो. मंगेश महाडिक

 

 

Back to top button