नागपूर : पोलीस आयुक्त कार्यालयात आग, फाईली जळून खाक | पुढारी

नागपूर : पोलीस आयुक्त कार्यालयात आग, फाईली जळून खाक

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : सिव्हील लाईन्स परिसरातील पोलीस भवन इमारतीत असलेल्या पोलीस आयुक्त कार्यालयात आज (दि.२३) दुपारी चारच्या सुमारास आग लागली. या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली.

नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन यंत्रणा, संबंधितांशी चर्चा केली. या आगीत काही फाईल्स जळाल्याची माहिती आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी तिसऱ्या माळ्यावरील एका केबिनमध्ये ठेवलेल्या या फाइल्स मात्र जळाल्या आहेत.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी तात्काळ घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button