Spotify Job Cuts : स्पॉटिफायमध्ये होणार कर्मचारी कपात; 6 टक्के कर्मचाऱ्यांना कमी करणार | पुढारी

Spotify Job Cuts : स्पॉटिफायमध्ये होणार कर्मचारी कपात; 6 टक्के कर्मचाऱ्यांना कमी करणार

पुढारी ऑनलाईन : Spotify Job Cuts – जगभरात विविध कंपन्यात नोकरकपात केली जात आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर अशा दिग्गज कंपन्यांबरोबरच स्वीगा, बायजूस, गो मेकॅनिक अशा भारतातील स्टार्टअप कंपन्यातूनही नोकरकपात करण्यात आली आहे. नोकरकपातीचे हे लोन आता म्युझिक स्ट्रिमिंग कंपन्यांतही सुरू झाले आहे. स्ट्रिमिंगमधील अग्रगण्य कंपनी असलेल्या स्पॉटिफायमधून ६ टक्के कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार आहे.

या वर्षी मंदीची भीती असल्याने विविध कंपन्या नोकरकपात करू लागल्या आहेत, असे सांगितले जाते.
स्वीडनमधील कंपनी असलेल्या स्पॉटिफाय ६ टक्के कर्मचारी कमी करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. जाहिरातदारांनी जाहिरातींवरील खर्च कमी केलेला आहे, याशिवाय वाढते व्याजदर, रशिया-युक्रेन युद्ध यामुळे अर्थव्यवस्थेवर दबाव असल्याचे कारण दिले जात आहे. कंपनीच्या जाहिरात आणि कंटेट व्यवसायाचे प्रमुख डॉन ओस्ट्रॉफही नोकरी सोडत आहे. स्पॉटिफायमध्ये सध्य ९८०० कर्मचारी आहेत.

हेही वाचा

Back to top button