नगर : घुमनदेव येथे घरातून दागिने, रोकड चोरीस | पुढारी

नगर : घुमनदेव येथे घरातून दागिने, रोकड चोरीस

 टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा :  श्रीरामपूर तालुक्यातील घुमनदेव येथून घरात पर्समध्ये ठेवलेले 22 हजार रूपयांचे दागिने व रोकड चोरीला गेल्याची फिर्याद सोपान रामराव पवार यांनी श्रीरामपूर तालूका पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. संक्रांत सणासाठी (दि. 15) जानेवारी रोजी पवार यांच्या पत्नी मंदा यांनी मंगळसूत्र व इतर दागिने घातले होते.

दि. 16 तारखेला घरातील पर्समध्ये हे दागिने ठेवून ती पर्स कपाटाला लटकावली होती. दि. 19 रोजी टाकळीभान येथे बाजाराला जायचे म्हणून दागिने घालण्यासाठी पर्स उघडली असता सुमारे 22 हजार रूपयांचे दागिने व रोकड चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 380 प्रमाणे चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button